पुणे – महापालिका हद्दीतील पुणेकरांसाठी पाच वर्षांपूर्वी सुरु केलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य योजना बंद न करता पुनर्रचना करुन पुन्हा करा, अशी मागणी माजी महापौर आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
मोहोळ यांनी आयुक्तांकडे विमा आणि आरोग्य तपासणी योजना पनर्रचनेसर पुन्हा सुरु करण्याची मागणी केली असून मा. महापौर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या योजना कार्यान्वित केल्या होत्या आणि सलग पाच वर्षे सुरुही ठेवल्या. मात्र प्रशासक म्हणून अंदाजपत्रक मांडताना या योजनांना तरतूद न दिल्याने योजना बंद आहेत. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी भेट घेत मागणीचे निवेदन दिले आहे.
“या दोन्ही योजना गरजू पुणेकरांसाठी पुन्हा सुरु होणे आवश्यक असून प्रशासनाने या योजनांची तातडीने अभ्यास करुन पुनर्रचना करावी. या योजना पुणेकरांसाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे यावर लवकरच घेण्यात यावा.” – मुरलीधर मोहोळ (माजी महापौर)