पुणे – पुणे पोलिसांनी रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मानाचे गणपती आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळापुढे आणि मध्यवर्ती भागात नागरीकांनी दर्शनासाठी गर्दी करु नये, यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.
पोलिसांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे तर मंडळांना मिरवणूक न काढण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही तुळगीबाग मंडळाने ढोल ताश्यासह मिरवणूक काढल्याने वादाचा प्रसंग उधभवला. पोलिसांनी ही मिरवणूक थांबवल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. ही बाब वगळता दुपारपर्यंत शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सव होत आहे. पुणे पोलिसांकडून मागील वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी गर्दी होऊ नये, यासाठी नियोजन केले आहे.
विसर्जनानिमित्त शहरात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. मानाच्या व प्रमुख मंडळांच्या गणपतीचे सकाळी 11 वाजल्यापासूनच मंडपातच विसर्जनस सुरवात झाली. नागरीक दर्शन घेण्यासाठी गर्दी करतील, म्हणून पोलिसांकडून मध्यवर्ती भागात येणारे बहतांश रस्ते बंद करण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ.शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी शहराच्या वेगवेगळ्या भागात बंदोबस्त करीत आहेत.मानाचे गणपती आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळापुढे आणि मध्यवर्ती भागात नागरीकांनी दर्शनासाठी गर्दी करु नये, यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे, बंदोबस्तवरील पोलिसांकडून नागरीकांना मध्यवर्ती भागात जाण्यास मज्जाव केला जात आहे.
त्याच बरोबर नदीपात्र, मुठा डावा का मुठा डावा कालवा, तलाव या ठिकाणी विसर्जन करण्यास मनाई असल्याने तेथेही पोलिसांकडुन नागरीकांना घरी किंवा फिरत्या हौदात विसर्जन करण्यास सांगत आहेत.