सांगली – एसटी महामंडळाला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची वेळ यावी, ही राग आणणारी बाब आहे. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत. पण कंत्राटदारांचे घरं भरण्याचं काम सुरूये. अशी टीका करतानाच परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातला सचिन वाजे कोण? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, माझा सरकारला इशारा आहे की ‘जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्या’ अन्यथा संघर्ष अटळ आहे.
या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या 21 सप्टेंबरला झरे, तालुका- आटपाडी, जिल्हा- सांगली येथे या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण तिथे जास्त संख्येनं यावं. अस आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे.