धक्कादायक! जिम ट्रेनरचे पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा संशय; जेडीयू नेत्याने ट्रेनरवर झाडल्या गोळ्या

नवी दिल्ली : बिहारच्या पटनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.  सत्ताधारी जनता दल युनायटेडच्या नेत्याने पत्नीच्या जिम ट्रेनरवर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली  आहे. या प्रकरणी त्या नेत्याला आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जिम ट्रेनरवर उपचार सुरु आहेत. या कृतीमागचे कारण समोर आल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

जेडीयूच्या वैद्यकीय अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव कुमार सिंह आणि त्यांची पत्नी खूशबूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 26 वर्षीय जिम ट्रेनची हत्या करण्यासाठी या दोघांनी मिळून कट रचला आणि अज्ञात लोकांना सुपारी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कदम कुवा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी सकाळी 6 वाजताची आहे. जिम ट्रेनर विक्रम हा स्कूटीवरून जिममध्ये जात होता. यावेळी त्याची वाट पाहत असलेल्या काही अज्ञातांनी त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. विक्रम 5 गोळ्या लागूनही कसाबसा 2.5 किमी स्कूटी चालवत हॉस्पिटलला पोहोचला. तेथे त्याच्यावर ऑपरेशन करून गोळ्या काढण्यात आल्या.

शुद्धीवर येताच त्याने पोलिसांना झालेला प्रकार सांगितला. सुरुतावातीच्या चौकशीत खूशबू आणि विक्रम हे एकमेकांना ओळखतात आणि बराच वेळ फोनवर बोलत असल्याचे समोर आले आहे. जानेवारीपासून आजवर या दोघांमध्ये जवळपास 1100 वेळा फोनवर बोलणे झाले आहे.
या दोघांमध्ये काहीतरी लफडे सुरु असल्याचा संशय खूशबूचा पती डॉ राजीव कुमार सिंहला होता. त्यामुळे एप्रिलमध्ये त्याने विक्रमला मारण्याची धमकी दिली होती. या गोळीबारात चार ते पाच शूटर होते. पोलीस अधिक तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.