पुणे – पुणे ग्रामीण पाेलीस दलात दाैंड येथे कार्यरत असलेल्या एका महिला पाेलीस कर्मचाऱ्याने बाळ संगाेपन रजेवर असतान पुण्यातील धनकवडी भागातील राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पूजा दत्तात्र्य कांबळे (वय-२८,रा.पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
काैटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचा पाेलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. पूजा कांबळे पुणे ग्रामीण पाेलीस दलात काम करत हाेत्या. दाैंड पाेलीस ठाण्यात महिला पाेलीस हवालदार म्हणून त्यांची नेमणुक हाेती. सध्या त्या बाळ संगाेपन रजेवर हाेत्या त्यामुळे पुण्यातील धनकवडी येथील घरात कुटुंबा समवेत त्या हाेत्या.
घरातील दुसऱ्या मजल्यावर त्या पतीसह राहत असताना रविवारी रात्री साडेदहा वाजण्याचे सुमारास त्या खालील मजल्यावर राहत असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना भेटण्यास न आल्याने, त्यांचे पतीने दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्यांना बाेलविण्यासाठी आवाज दिला असता दरवाजा उघडला गेला नाही/ त्यामुळे त्यांनी खिडकीची काच फाेडून घरात डाेकवले असता त्या दिसून न आल्याने त्यांनी दरवाजा ताेडून घरात प्रवेश केला.
त्यावेळी बेडरुम मधील खाेलीत त्यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्या मिळून आल्या. त्यांना तात्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डाॅक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले.
सहकारनगर पाेलीसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता ससून रुग्णालयात नेला. याप्रकरणी सहकारनगर पाेलीस पुढील तपास करत आहे.