पुणे : भरधाव मिक्सर ग्राईंडर ने धडक दिल्याने दुचाकीस्वार खोल दरीत तीस चाळीस फुट कोसळला हि घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली. क्षआलिम मुजावर असे जखमी दुचाकीस्वार जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी अकरा वाजता मिक्सर ग्राईंडर कात्रज जुन्या घाटातून पुण्याकडे येत असताना ब्रेक निकामी झाल्याने पुढे चाललेल्या दुचाकी स्वारास धडक दिली यामध्ये दुचाकी स्वार तीस ते चाळीस फुट खोल दरीत कोसळा असून दुचाकी सुरक्षा भिंतीला अडकून मोठे नुकसान झाले आहे. भारती विद्यापीठ पोलीस आणि कात्रज अग्निशमन केंद्रातील जवान चालक अनंता जागडे फायरमन रमेश मांगडे, तेजस मांडवकर, शिवदास खुटवड, देवदूत चालक रुपेश जांभळे, फायरमन शुभम शिर्के, नीलेश तागुंदे मंदार, नलावडे, राजेंद्र भिलारे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकीस्वारास बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.