पुणे – शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजात गतिमानता यावी. कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्रशासनाने क्षमता बांधणी समिती नेमण्यात आली आहे. तिच्या माध्यमातून देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात देशातील सहा शहरांची निवड करण्यात आली असून यात पुणे महापालिकेचाही समावेश असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रशिक्षणात दैनंदिन कामकाजासह, कायदे, निविदा प्रक्रीया, दैनंदिन कामकाजात एआय असेच तंत्रज्ञानाचा वापर, नागरी सनद, अशा वेगवेगळ्या स्वरुपाची प्रशिक्षणे व्हिडिओच्या माध्यमातून मोबाइल ऍपवर देण्यात येणार आहेत.
त्यासाठी केंद्रशासनाने “आय गॉट’ नावाचे ऍप विकसित केले आहे. यात 600 पेक्षा अधिक वेगवेगळे व्हिडिओ कोर्स आहेत. तर, महापालिकेच्या वेगवेगळ्या 12 विभागांसाठी 62 प्रकाराचे कोर्स असून महापालिकेच्या 500 हून अधिक कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नोंदणी केली आहे.