युवराज जेधे ः महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलची आढावा बैठक
भोर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन व संरक्षणासाठी देशातील पहिला राजकीय गड किल्ले संवर्धन सेल स्थापन करणार्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेलमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांचा ओढा वाढला आहे.
नव्याने सहभागी होणा-या पदाधिका-यांना नियुक्ती पत्र वाटप आणि गेल्या तीन महिन्यांत पदभार स्विकारलेल्या पदाधिकार्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकिला उस्फुर्त प्रतिसाद लाभला असल्याची माहिती युवराज जेधे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार, युवराज जेधे,
पुणे जिल्हा अध्यक्ष समीर धुमाळ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलची आढावा बैठक व विभागवार पदाधिकार्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सेल स्थापन होऊन केवळ तीन महिन्यांत नियुक्त केलेल्या पदाधिका-यांनी केलेल्या कामाचा आढावा प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांच्याकडे सादर केला.
उपस्थित पुणे जिल्हा व राज्यातील पदाधिका-यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गड किल्ले संवर्धन हि राज्यव्यापी चळवळ बनवण्याचा निर्धार पदाधिकार्यांनी केला. यावेळी गड-किल्ले संवर्धन सेलचे युवराज मुजुमले, महेंद्र देवघरे, नितिन कुडले मयुरेश पासलकर, वल्लभ कोकाटे, जनार्धन घोडे ,अतुल कोरडे ,मनोज कडू ,धनाजी पासलकर ,तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
पुणे जिल्हा संघटक – शंकर चिकणे (उपसरपंच कोर्ले), पुणे जिल्हा उपसंघटक – कपिल देशपांडे, भोर तालुका अध्यक्ष – संकेत धनावडे, भोर तालुका उपाध्यक्ष – अजित थोपटे, हवेली तालुका अध्यक्ष – रामदास ढमढेरे, शिरूर तालुका अध्यक्ष – विकास खाडे, दौंड तालुका उपाध्यक्ष – सर्जेराव गरदडे (मा. ग्रामपंचायत सदस्य, खोपोडी), भोर तालुका संघटक – नितीन कोंढाळकर (उपसरपंच पानव्हळ ), भोर तालुका उपसंघटक – योगेश परखंदे (ग्रामपंचायत सदस्य ,सांगवी भिडे).