जलजीवन मिशन योजेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
कापूरहोळ – जल जीवन मिशन योजनेंतर्गत कांबरे खे.बा. गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी ९२ लाख रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहेत. ही योजना पूर्ण झाल्यानंतर पाणीप्रश्न कायमचा सुटेल, असे भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
कांबरे खे.बा. (ता. भोर) येथील जल जीवन मिशन योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सागर शिंदे, उपसरपंच पार्वती यादव, श्रीरंग कोंढाळकर, प्राची महांगरे, संगीता कोंढाळकर, नंदा निगडे, दशरथ मांढरे, पोलीस.पाटिल सुमीत कांबळे,
तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष रामदास यादव, मयूर कोंढाळकर, कांता यादव, प्रशांत मोहिते, अमर कोंढाळकर, प्रतिक शिंदे, दादा सणस, मामा पोमण, दादा कोंढाळकर, सोमनाथ धनावडे, प्रकाश यादव, आबासो मोहिते, संतोष निगडे,
बापू नाईलकर, दादा शेलार, रामभाऊ गिरे, सुभाष मोहिते, उत्तमराव कोंढाळकर, राजाराम कोंढाळकर, दिपक शिंदे, साहेबराव चव्हाण, बापू कोकरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.