फळबागांवरही रोगांचा प्रादुर्भाव ः शेतकरी हवालदिल
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे व परिसरामधील शेतकरी मागील वर्षी अतिवृष्टी तर यावर्षी दुष्काळसदृश परिस्थितीने हतबल झाला असताना, शेतातील पिके कशीबशी जगवली असताना या पिकांना होत असलेले विविध रोगांमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम शेतीवर आणि पर्यायाने पिकांवर होत आहे. पावसाळ्यात पाऊस पडला नसताना आता ढगाळ हवामान झाल्याने फळबागांसह मका, तूर आदी पिकांवर करपा व तांबेरा व किडीचा प्रादूर्भाव निर्माण झाल्याने उत्पादन व उत्पन्न घटल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
जनावरांना ओला चारा म्हणून, मका, कडवळ आदी चारा पिके करतात. मागील काही दिवसांपासून मका पिकांवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्याने मका पिक वाचवण्यासाठी अनेक शेतकरीवर्ग त्यासाठी औषध फवारणी करताना दिसत आहेत.
वाढ्याचा भेळा 300 रुपये
दुधाला महागाईच्या तुलनेत योग्य बाजारभाव मिळत नसल्याने 10 उसाचे वाढे असलेला भेळा शेकडा 300 तर 20 वाढ्याचा भेळा शेकडा 600 रुपयाला विकत घेऊन जनावरांना टाकणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दुधाचे बाजार अपेक्षित मिळत नसल्याने आगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मका पिक वाचवण्यासाठी औषध फवारणीसाठी अधिक आर्थिक संकटाच्या खोलामध्ये गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडला आहे.
चारा कसा मिळेल…
सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांच्या ओल्या चाऱ्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. मका पिकांवर होत असलेल्या किडीच्या प्रादुर्भावामुळे तसेच मका पिकावरील कीड चूकन जनावरांच्या पोटामधे गेल्यास जनावरे दगवण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग ओला चारा कसा मिळेल याकडे लक्ष देऊन होते. नुकतेच साखर कारखाने सुरू करण्यात आल्याने उसाचे वाढे हा एक पर्याय शेतकरी वर्गासमोर आहे.
लष्करी अळीसाठी फवारणी सुरू
लष्करी आळी मका पिकांला झाल्यावर मक्याची पाणे आळी खाऊन, मका पिकांच्या कोब्यामध्ये आळी राहिल्यान व ती मका चाऱ्यामधून जनावरांच्या पोटामध्ये गेल्यावर, जनावरांचे पोट फुगून जनावरे दगवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे येथील शेतकरी मका पिकांवर लष्करी अळीचा नाश करण्यासाठी औषध फवारणी करताना दिसत आहेत.