शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी
जांबूत – काठापूर खुर्द (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप औटी यांच्या एकमताने फेर निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विशाल सुक्रे व रमेश दाते यांची निवड झाली.
शाळेत आयोजित केलेल्या पालक मेळाव्यात एकमताने निवड करण्यात आली. सदस्य म्हणून कोमल किरण भागवत, प्रियांका अमोल तांबे, उर्मिला राहुल थिटे, कविता चित्रांगण लोंढे, हेमा प्रकाश कुलकर्णी, अतुल बबन औटी, दिलीप जिजाबा होळकर, योगिनाथ शिवाजी दाते, दीपक ज्ञानदेव होळकर, कैलास बबन लोंढे, रुपेश रामदास दिघे,
विश्वनाथ वसंत जाधव, शुभांगी सुभाष कोरडे यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून मुख्याध्यापक संपत पोखरकर यांनी काम पाहिले. यावेळी निवड झाल्याबद्दल शाळेच्या व पालकांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच सीमा थिटे, उपसरपंच राजाराम दाते व माजी सरपंच बिपिन थिटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भरत दाते, उपाध्यक्ष रंगनाथ होळकर, पालक, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.