सहकारमंत्री वळसे पाटील : ओतूर शाखेचा शुभारंभ
ओतूर – लाला बँकेचे संस्थापक स्व. किसनराव बाणखेले यांनी समाजाचा आर्थिक स्तर उंचावर यासाठी लाला बँकेची स्थापना केली. तोच समाजसेवेचा वसा बँकेच्या माध्यमातून त्यांचे नातू युवराज बाणखेले जोपासत आहे.
रिझर्व बँकेने लाला बँकेवरील सर्व निर्बंध मागे घेतल्याने अध्यक्ष संचालकांचे अभिनंदन केले. अनेक बँकांनी शिस्तीचे पालन न केल्यामुळे अडचणीत आलेल्या आहेत. परंतु लाला बँकेचे मागील कामकाज पाहता बँक अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज करीत असल्याने पुढील काळात बँकेला उज्वल भविष्य आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
लाला अर्बन बँकेची 14 व्या ओतूर (ता. जुन्नर) शाखेचे सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 24) उद्घाटन करण्यात आले., त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालिका मथूरा थोरात, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे, भीमाशंकरचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत भालेराव, रोहित ढमाले, विघ्नहरचे संचालक यशराज काळे, विकी काकडे, बँकेचे संचालक अॅड. निवृत्ती काळे, रामदास बाणखेले, अशोक गांधी, नितीन लोणारी, नारायण गाढवे, मंगेश बाणखेले,
जयसिंग थोरात, संदीप लेंडे, डॉ.सचिन कांबळे, सुनिता साकोरे, इंदूमती कवडे, सुनील भुजबळ,भानुदास टेंगले, तज्ज्ञ संचालक डॉ. जैनुद्दीन मुल्ला, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. सुरम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे, सभासद राजु इनामदार, राम गावडे, राजबाबू थोरात, प्रियंका शेळके, धोंडीभाऊ घांगळे, विश्वनाथ नलावडे, देविदास तांबे, बाळासाहेब शिंदे, भगवान घोलप, माळवे गुरुजी, अभिषेक गुंजाळ, भगवान तांबे, प्रशांत गाडे, सचिन मोरडे उपस्थित होते.
बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. ओतूर शाखेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील ग्राहकांना बँकिंग सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्षांमध्ये बँक ग्राहकांसाठी मेळावे व विविध योजना राबवीत आहे. बँक 14 शाखा आणि एटीएम द्वारे सेवा देत असून लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा सुरू होत आहे.
– युवराज बाणखेले, अध्यक्ष
बँकेने क्रेडिट रेटिंग सिस्टीम नुसार कर्ज पुरवठा केल्याने ग्राहकांना त्याचा चांगला फायदा झाला असून बँकेच्या व्यवसायात वाढ झाली आहे असे नमूद केले. 2023 वर्षात सभासदांना सहा टक्के दराने लाभांश वाटप करण्यात आला.
– डी. एन. सुरम, मुख्य कार्यकारी अधिकारी