अब्राहाम आढाव : बारामतीत पुरस्कार प्रदान
बारामती : जनता – प्रजा ही राजा आहे, आणि राजा झोपलेला आहे या उक्तीप्रमाणे विविध समस्याचे निराकरण केले. माहितीचा अधिकार घराघरात गेला पाहिजे, असे मत ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अब्रह्म आढाव यांनी व्यक्त केले. एस. पी. नागरी सहकारी पतसंस्था बारामती व ज्ञानमाता सेवाभावी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकध्यक्ष संभाजी होळकर हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषदेचे प्रशासन आधिकरी संजय जाधव, पोलीस अधिकारी आबाजी जगदाळे, ज्येष्ठ नागरी संघाचे अध्यक्ष माधव जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष अनिता गायकवाड उपस्थित होते.
यावेळी समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सर्वोत्कृष्ट सामाजिक पत्रकारिता पुरस्कार राजेंद्र गलांडे, दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी प्रमोद ठोंबरे, संतोष जाधव यांना प्रदान करण्यात आला. चक्रपाणी चाचर यांना बारामती रत्न पुरस्कार देण्यात आला. नामदेव जगताप यांना सर्वोत्कृष्ट स्कूल बस ड्रायव्हर पुरस्कार तर पूजा जंगम यांना समाजरत्न पुरस्कार, डॉ. तुषार गदादे यांना वैद्यकीय क्षेत्रातील समाजरत्न पुरस्कार, अब्राहाम आढाव यांना माहिती अधिकार प्रशिक्षण पुरस्कार संभाजी होळकर यांचे शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक चेअरमन राहुल बनकर यांनी केले. संजय जाधव प्रशासन अधिकारी तथा विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती यांनी लेखाजोखा मांडताना मांडला. सूत्रसंचालन रेवती पाटील व अफ्रीन बागवान यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, सचिन नगरे, प्रमोद भोसले, शुभांगी बनकर, सतीश जगताप, करिष्मा पवार, मेघा जगदाळे, सुमय्या शेख, अंजना मासाळ, रिटा घोरपडे, कीर्ती सुतार कीर्ती जावळे, मनीषा शिंदे, वृंदा काशीद, शितल खरचे, सोनिया मॅडम, चंद्रकांत भंडलकर, उमेश भोसले आदींचे सहकार्य लाभले.