– उत्रौली जिल्हा परिषद शाळेने जिल्हा लेझीममध्ये पटकाविला तृतीय क्रमांक
वीसगाव खोरे : उत्रौली (ता. भोर) येथील पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त, राज्य मॉडेल स्कूल, भोर
तालुक्यातील पहिली आय. एस. ओ. मानांकन असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जिल्हा स्तरीय लेझीम स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. पुणे येथील बालेवाडी येथे यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १७ संघांनी लेझीम स्पर्धेत सादरीकरण केले.
शाळेने लेझीम स्पर्धेतील यशाची परंपरा कायम राखीत लहान गट मुले लेझीम स्पर्धेत पुणे जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला. सुंदर वेशभूषा, ऐतिहासिक प्रसंगाचे प्रभावी सादरीकरण, ताल आणि लयबद्ध ढोल ताशांचा ठेका यामुळे सलग चौथ्या वर्षी जिल्हास्तरीय लेझीम स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकात येण्याचा मान उत्रौली शाळेने यावर्षी देखील पटकविला.लहान गटाने लेझीम खेळातून शिवचरित्र साकारले. यात शिवरायांचा जन्म, शाहिशीस्तीखानाची फजिती, अफझलखानाचा वध, राज्याभिषेक हे प्रसंगांचे सादरीकरण केले.
शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणासाठी केंद्रप्रमुख अंजना वाडकर, मुख्याध्यापिका संगिता पापळ, शिक्षक विठ्ठल दानवले, अनिता सुतार, अमर उभे, अश्विनी पवार, अनिता लोखंडे, वैशाली चिंचकर यांनी मार्गदर्शन केले.
पुणे जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भरत शिवतरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश शिवतरे, माजी सरपंच भगवान शिवतरे, उपसरपंच संतोष शिवतरे, युवा उद्योजक अतुल शिवतरे, वि. का. सोसायटीचे चेअरमन सचिन शिवतरे, माजी सरपंच नवनाथ शेटे,ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.
शिवरायांचा जीवनपट साकारले लेझीम सादरीकरणात शिवरायांचे जीवनपट साकारताना रनवाद्यातून शिवरायांचा प्रवेश, शिवरायांचा जन्म, शिवरायांचे बालपण, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, राज्याभिषेक सोहळा, हे प्रसंगाचे सादरीकरण करताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, जोश, वीरश्री संचारल्याचे अनुभवास आले.