पिरंगुट – भूगाव (ता. मुळशी) येथे राम नदीजवळ पोलिस मदत कक्ष सुरू करावे, अशी मागणी मुळशी तालुका शिवसेना प्रमुख दीपक करंजावणे यांनी केली आहे.
याबाबत पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे उपस्थित होते.
पुणे ते दिघीबंदर महामार्गावर राम नदीपासून मुळशी तालुक्याची हद्द सुरू होते. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. परिणामी अनेकदा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.
त्यामुळे भूगावमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या ठिकाणी पोलीस मदत कक्ष तयार करून पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांची नेमणूक करावी. असे या निवेदनात म्हटलेले आहे. या वेळी महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख कांताताई पांढरे, तालुका आघाडीच्या प्रमुख सविता कुंभार आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.