देवदत्त निकम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
मंचर/पारगाव शिंगवे – नागापूर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 23) सकाळी भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला.
पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक तथा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, विद्यमान संचालक देवदत्त निकम यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गट पंधरा वर्षांपुढील सात किलोमीटर, महिला गट पंधरा वर्षांपुढील सात किलोमीटर, मुले गट पंधरा वर्षेपर्यंत चार किलोमीटर, मुलीगट पंधरा वर्षापर्यंत चार किलोमीटर ठेवण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाला 5 हजारापासून रोख रक्कम आणि चषक बक्षीस देण्यात आले. स्पर्धेतील सहभागींना मेडल देण्यात आले .
यावेळी विविध मान्यवरांनी देवदत्त निकम यांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या, तर काहींनी उपस्थित राहून अभिष्टचिंतन केले. उद्योजक किसनशेठ उंडे, गुलाबराव धुमाळ, विजयराव रसाळ, दौलतराव भोर, धोंडीभाऊ भोर, किसन उंडे, नागापूरचे सरपंच गणेश यादव, गोपाळराव गवारी, दत्तात्रय गाढवे, राजेश राजपूत, महादु (कारभारी) भोर, संजय भोर, नवनाथ भोर, गणेश भोर, दत्ताशेठ हगवणे, राजेश तनपुरे, हनुशेठ गव्हाणे, संजय बढेकर,
शरद बोंबे, विशाल भोर, विशाल वाबळे, किरण आगळे, हाजी सैद अजाबा, डॉ. संजय घाडगे, तेजस भोर, डॉ. अशोक भोर, सुनील शिंदे, सचिन पवार, प्रकाश पवार, ज्ञानेश्वर निकम, विजय वाघ, मनिषा भोर, पंढरीनाथ तळेकर, गणपत लोंढे, अर्जुन भोर उपस्थित होते. या आरोग्य शिबिर आणि मॅरेथॉन कार्यक्रमाचे संयोजन सरपंच गणेश यादव, उपसरपंच भरत मस्के, मंगेश वाघ, डॉ. संजय वाघ, संदेश वाघ, बंडेश वाघ यांसह ग्रामस्थांनी केले.
कर्करोग शिबिर
“स्व. श्रीमती पार्वतीबाई कुंडलिकराव निकम सामाजिक प्रतिष्ठान’तर्फे 35 वर्षांपुढील महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिर आयोजित केले होते.