नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई
जळोची – पुणे- सोलापूर महामार्गावरील वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने परिवहन आयुक्त यांचे आदेशान्वये वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 10 खासगी बसेस, 4 स्कूल बस अवजड वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांसह मद्य प्राशन करणाऱ्या 6 जणांवर कारवाई करीत 5 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहिम पूर्ण महिनाभर कडक स्वरुपात राबविण्यात येणार आहे.
मोहिमे अंतर्गत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 3 प्रवासी बसेसवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एका स्कूल बसचा समावेश आहे. अवजड मालाची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. ज्यामध्ये बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणाऱ्या टिपर वाहनाचा समावेश आहे.
विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत 10 खासगी बसेस, अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कलम 194 ड अंतर्गत, तर दुचाकी वाहनांवर व 4 स्कूल बसवर कारवाई करण्यात आली. तसेच मद्यप्राशन करणाऱ्या 6 जणांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 5 लाख रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंतकुमार सोलनकर, मोटार वाहन निरीक्षक सूरज पाटील, सहायक मोटार वाहन निरीक्षक अमरसिंह चोथे, सहायक मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश हांगे, सहायक मोटार वाहन निरीक्षक हर्षदा खारतोडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी केली.