नेवासा – भारतीय संस्कृती हि अगाध व अनंत आहे. या भारतीय संस्कृतीतील लोककला समाजातील दुर्गुणांवर ठळकपणे भाष्य करतात व समाजात प्रबोधन घडवून आणत नवसृजनशील समाज घडवतात. याच लोककला प्रकारातील सर्वात प्रसिद्धीस पावलेला प्रकार म्हणजे भारूड. या भारुडास लोकमान्यता व प्रसिद्धीस आणण्याचे काम महाराष्ट्रातील थोर संत एकनाथांनी केले.
याच भारूड लोककलेचा आधार घेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी म्हस्केवाडी गावात लोकसंख्या नियंत्रण व समाजातील अनिष्ट चालीरितींवर आधारित भारूड सादर करत म्हस्केवाडी ग्रामस्थांचे प्रबोधन केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अळकुटी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा कॅम्प म्हस्केवाडी येथे असताना त्यांनी शिबिराच्या चौथ्या दिवशी ‘लोकसंख्या नियंत्रण व अनिष्ट प्रथा’ या विषयावर भारूड सादर केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद पारखे होते. कार्यक्रमाप्रसंगी प्रा. विशाल रोकडे, प्रा. दत्तात्रय शेळके, प्रा. राजाराम गोरडे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अर्जुन चाटे, प्रा.पोपट सुंबरे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दशरथ पानमंद व आभार प्रा. सुप्रिया पारखे यांनी केले.