लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा परिसरातील डोंगरावर रविवार (दि.15) पहाटे दीपावलीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय मिळविल्यानंतर दीपावलीदिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. याच परंपरेचा स्मरण करून युवकांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रामदारा याठिकाणी 551 दिव्यांनी जय श्रीराम साकारण्याचा निश्चय केला.
रामदरा येथील छोटी टेकडी महादेव मंदिरासमोर दिव्यांमध्ये आणि रांगोळीमध्ये ही कलाकृती बनविण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, माता भगिनी, मुले उपस्थित होती.
दरवर्षी लक्ष्मीपूजनाला रामदरा या ठिकाणी दीपोत्सव करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. पुढील वर्षी 5001 दिव्यांनी दीपोत्सवाचा संकल्प केला आहे. हा दीपोत्सव अविस्मरणीय होता, असे मत यावेळी कमलेश काळभोर यांनी व्यक्त केले.