यंदापासून “जेम्स ऍन्ड ज्वेलरी डिझाइन’ पदवी

पुणे विद्यापीठात अभ्यासक्रम : जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया

व्यंकटेश भोळा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तरावर “जेम्स ऍन्ड ज्वेलरी डिझाइन’ हा तीन वर्षांचा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून विद्यार्थ्यांना रोजगार संधीसह या क्षेत्राला मनुष्यबळाची उपलब्धतता होणार आहे.

 

पुणे विद्यापीठाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स ऍन्ड ज्वेलरी, मुंबई यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या आंतरशाखीय अभ्यास विद्याशाखेंतर्गत आणि विद्यापीठातील स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रम नव्याने प्रस्थापित करण्यास आणि त्याच्या आराखड्यास व अभ्यासक्रमास विद्यापीठ अधिकार मंडळाने मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम जानेवारीत सुरू होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या आंतरशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पहिल्यांदाच “जेम्स ऍन्ड ज्वेलरी डिझाइन’ या विषयावर नव्याने अभ्यासक्रम सुरू करणारे विद्यापीठ आहे.

 

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पुढाकार घेतला आणि या अभ्यासक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील, यादृष्टीने पाऊल उचलले आहे. बी.ए. (जेम्स ऍन्ड ज्वेलरी डिझाइन) हा नवीन अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे.

 

प्रवेशाची क्षमता सुरुवातीला 30 इतकी असणार आहे. यात जेम्स ऍन्ड ज्वेलरी डिझाइनवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर संशोधनही केले जाणार आहे. यातून मनुष्यबळ निर्मिती होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. जेम्स व ज्वेलरी हे परदेशातून आयात होणाऱ्या उत्पादनास पर्याय निर्माण होण्याच्या उद्देशानावर संशोधनावर भर दिला जाणार आहे. त्यातून अधिकाधिक मनुष्यबळाची निर्मिती होण्यास हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

मुंबईत इंडियन इस्टिट्यूट ऑफ जेम्स ऍन्ड ज्वेलरी यांच्या सहयोगातून हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून, असा अभ्यासक्रम पुण्यात सुरू करणारे पुणे विद्यापीठ एकमेव आहे. यात परदेशांतून आयातीस पर्यायी उत्पादन निर्माण होणारे संशोधन केले जाणार आहे. लवकरच विद्यापीठातील रोजगारनिर्मितीचे स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा विस्तार करण्याचा मानस आहे.

– प्रा. डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता, आंतरविद्याशाखीय अभ्यास

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.