वडगाव आनंद शाळेची ग्रामपंचायतीकडे मागणी
आळेफाटा : वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील भोजन कक्षाच्या छतावर सौर ऊर्जा, पवनचक्की प्रकल्पासह शाळा इमारत छताची गळती दुरुस्ती, खेळणी असलेल्या बागेत हिरवळ (लॉन), शालेय बागेत ठिबक सिंचन दुरुस्ती, संगणक आदी बाबींची मागणी शाळेच्या वतीने ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे.
शाळेच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी शाळेच्या वतीने वरील मागणी करण्यात आली. दरम्यान, या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असा प्रतिसाद सरपंच व उपसरपंच तसेच उपस्थित सदस्यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी सरपंच रेलिका जाधव, उपसरपंच ऋषी गडगे, ग्रामपंचायत सदस्य गणेश भुजबळ, प्रफुल इथापे, संदीप गडगे, संतोष पादिर, गोरक्ष देवकर, सोमनाथ गडगे,
सदस्या अर्चना काशिकेदार, वंदना शिंदे, वैशाली देवकर, अल्पना देवकर, कल्पना पादिर, अश्विनी चौगुले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश चौगुले, उपाध्यक्ष संदेश काशिकेदार, शिक्षणतज्ञ डी. बी. वाळुंज, व्यवस्थापन सदस्य सतीश भिंगारदिवे, सचिन देवकर, रेश्मा कुटे, वृषाली चौगुले, गणेश चौगुले, मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, सहाशिक्षिका वृषाली कालेकर, संगीता कुदळे, मनीषा इले, गौरी डुंबरे यांच्यासह सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कुदळे यांनी तर सुनील ठिकेकर यांनी आभार मानले.