रांजणगाव गणपती – भारतीय मीडिया फांउडेशनच्या महिला सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कारेगाव (ता. शिरुर) येथील उद्योजिका वंदना पोटे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय मीडिया फाउंडशेनच्या वतीने २०२४- २५ या वर्षासाठी रणनिती निश्चित करण्यात येऊन सक्रीय सदस्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. केंद्रीय मॅनेजमेंट अफेअर्स कमिटी तसेच राष्ट्रीय कोअर कमिटीच्या मार्गदर्शनानुसार मीडिया फाउंडेशनचे अध्यक्ष संजयकुमार मौर्य, राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद आसिफ अंसारी यांनी संघटनेस सशक्त करण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे.
फाउंडेशनचे संस्थापक सदस्य तथा राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद आसिफ अन्सारी यांनी सांगितले की, वंदना पोटे यांनी फाउंडशेनच्या महिला सेलच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करताना संघटनेस एक नवे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. मिशन २०१५-२५ च्या रणनितीनुसार वंदना पोटे यांच्यावर महिला सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात येत आहे.
देशभरात जिल्हा कार्यकारणी तसेच प्रदेश कार्यकारणीच्या नियुक्तीची जबाबदारी देत पोटे यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी संधी दिली आहे. भारतीय मीडिया फाउंडेशन केंद्रीय मॅनेजमेंट कमिटी तसेच राष्ट्रीय कोअर कमिटीच्या वतीने प्रदेश तसेच जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्यासबंधी सूचना दिल्या असून त्याचा अहवाल सादर करण्याबाबात पोटे यांना सूचित केले आहे. पोटे यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल जातेगाव परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.