वीजबिल थकल्याने महावितरणने केली होती वीज खंडित
पौड – मुळशी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची 21 ग्रामपंचायतीनी 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत 2 कोटी 87 लाख 02 हजार 79 रुपये लाख रूपये थकीत पाणीपट्टी न भरल्याने ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला असून, यामध्ये सर्वाधिक पाणीपट्टी ही पौड ग्रामपंचायतीने 1 कोटी 36 लाख 21 हजार 790 सातशे नव्वद रूपये थकवलेली आहे. त्यापैकी सध्या 27 लाख 46 हजार 020 वीस रुपये जमा करण्यात आल्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
गेली काही दिवस पाणी न आल्याने सर्वच गावामध्ये पाणीबाणीच जाहिर झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण होऊ लागली होती. याबाबत सूचना देऊनही ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी न भरल्याने या ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. पाणी पुन्हा सुरू होणार असल्याने नागरिकांना काही दिवस दिलासा मिळणार आहे तरी उर्वरीत रक्कम लवकर भरण्यात यावी जेणेकरून पुन्हा ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा खंडित करण्याची वेळ येऊ नये. सध्या मुळशीत निवडणुकीचे वातावरण असून आणि प्रशासक असल्याने वसुलीवरती परिणाम होताना दिसत आहे.
सध्या शेरे ग्रामपंचायत नेहमी करवसुली अग्रेसर असते. त्यांचे कौतुक करावे ते कमीच आहे. या ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन इतर ग्रामपंचायतींनी करवसुली करावी, त्यामुळे थकबाकी शिल्लक राहणार नाही आणि पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहील. तरी उर्वरीत राहिलेली रक्कम लवकरात लवकर जमा करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
-संजय ढमाळ, मुळशी गटविकास अधिकारी
गावातील सर्वांना एकत्र घेऊन आणि विश्वासात घेऊन पाणीपट्टी, घरपट्टी वसूल केली जाते. ज्याची थकलेली असेल त्याची हयगय न करता पाणी कनेक्शन बंद करतो त्यामुळे आमची ग्रामपंचायतमध्ये 95 टक्के करवसुली होते. यामध्ये गावातील नागरिकांनाचे सहकार्य असते. त्यामुळे आम्ही दरवेळेस आगाऊ रक्कम जमा करत असतो.
-संतोष ढमाले, सरपंच शेरे गाव