आळंदी – शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.
गेली 7 वर्षांपासून आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजेच 14 डिसेंबर रोजी सुमारे 150 शनिभक्तगण स्वखर्चाने श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर (जि. नगर) येथे घेऊन जातात. पहाटे 4 वाजता शनी महाराजांना सर्वांच्या साक्षीने अभिषेक घालून आरती केली जाते.
तसेच दुसर्या दिवशी आळंदी येथील अनाथ अपंग गोरगरीब यांना अन्नदान केले जाते. रात्री येथील वेदपाठशाळेत आपल्या वेगळ्या म्हणजे धार्मिक विधी पद्धतीने केक कापत वायफळ खर्चाला फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने देवा ब्राम्हणांच्या साक्षीने मंत्रोच्चारात साजरा करण्यात आला. यावेळी तेथील वैदिक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देण्यात आले. मित्र मंडळी, सगे सोयरे यांनाही भोजन देण्यात आले.
त्याचबरोबर तेथील रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना अन्नदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आपुलकी वृद्धाश्रमातही अन्नदान केले. माऊली मंदिरात मोफत आरोग्य शिबीर, मोफत चष्मे वाटप व तुळशीची रोपे देण्यात आली. तसेच आळंदी येथील दोन आश्रमात अन्नदान करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी राहुल चव्हाण कार्याबद्दल गौरवोदगार काढून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सचिन गिलबिले, प्रशांत कुर्हाडे, उदय काळे, किशोर कुर्हाडे, ज्ञानेश्वर घुंडरे, महादेव पाखरे, दिनकर तांबे, साईनाथ ताम्हाणे, शशिकांत बाबर, वैभव पाटील, राजेश पाम्पटवार, सचिन शिंदे, किरण कोल्हे, निलेश आढळराव, वामन खुळे, योगेश शिर्के (गुरव), उत्तम पाटोळे, ज्ञानेश मंडले, अभी मुंगसे, अमित डफळ,
आशिष गोगावले, दत्ता काळे यांच्यासह शनिशिंगणापूर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भागवत बनकर यांच्या हस्ते चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. किशोर देशपांडे, अतुल भंडलकर, योगेश पगडे, हनुमंत चव्हाण, भोलापुरी महाराज, रोहिदास कदम, नितीन ननवरे, हिरामण तळेकर, गोविंद पाटील, मोहन तळेकर, सचिन गिलबिले, संदीप महाराज नागरे, कृष्णानंद आवटे, स्वराज चव्हाण आदी उपस्थित होते.