आठ लाखांची तरतूद : समस्यांचे निराकारण होणार
तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगांमधून गावातील कचरा व्यवस्थापनासाठी नुकतेच ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी केली आहे. वाहनाचे लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. आठ लाख वीस हजार रुपयांची खरेदी केली आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनास मदत होेईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी दिली.
तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीमार्फत कचरा व्यवस्थापानासाठी कचरा प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. त्याचाच एक भाग म्हणून कचरा साठविण्यासाठी किंवा साठविलेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक साधन खरेदी केले आहे. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, माजी सभापती आरती भुजबळ,
माजी उपसभापती अनिल भुजबळ, माजी पंचायत समितीचे सदस्य अरुण भुजबळ, उपसरपंच राहुल भुजबळ, सदस्य गोविंद ढमढेरे, ॲड. सुरेश भुजबळ, माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे, शिरुर तालुका भाजपा उपाध्यक्ष संदीप ढमढेरे, माजी चेअरमन शिवाजी भुजबळ, माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम रासकर, शिवाजी भुजबळ, बबन भुजबळ,
शहाजी ढमढेरे, माऊली नरके, भरत भुजबळ, अर्जुन तोडकर, राजेंद्र ढमढेरे, सत्यवान शिंदे, बाळासाहेब शिंदे, तळेगाव पोलीस स्टेशनंचे पोलीस हवालदार किशोर तेलंग उपस्थित होते.