आचार्य अॅकॅडमीतर्फे व्याख्यानाचे आयोजन
बारामती – नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात येत्या रविवारी (दि.७) रोजी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे इंदापूर येथे व्याख्यान होणार आहे.
इंदापूर येथे १७२९ आचार्य अॅकॅडमीची शाखा नुकतीच सुरु करण्यात आली. आहे. याच ठिकाणी पुणे सोलापूर बायपास कॉर्नरवरील डॉ. कदम गुरुकुल कॅम्पसमध्ये त्यांचे व्याख्यान होणार आहे. बारामतीत अल्पावधीत विद्यार्थी आणि पालकांच्या पसंतीस उतरलेल्या १७२९ आचार्य अॅकॅडमीने पुण्यातील वाकड आणि बालेवाडी पाठोपाठ आता इंदापूरातही आपली शाखा सुरु केली आहे. डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊ इच्छिणाऱ्या इंदापूर आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आता त्यांच्या घराजवळ यासाठीचे प्रशिक्षण मिळविण्याचा मार्ग यानिमित्ताने उपलब्ध झालेला आहे.
विद्यार्थी व पालकांसाठी प्रा. बानुगडे “गरुडझेप यशाची” या विषयावर बोलणार आहेत. प्रा. नितीन बानुगडे त्यांच्या प्रेरणादायी भाषणांमुळे संपूर्ण महाराष्ट्र परिचित आहे. इंदापूरकरांनीही या संधीचा फायदा घ्यावा. जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांकडून केले आहे.
हा कार्यक्रम विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत असला तरी प्रवेशिका असणाऱ्यांनाचा या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका आचार्य अॅकॅडमी, डॉ. कदम गुरुकुल कॅम्पस इंदापूर येथे उपलब्ध आहेत. ऑनलाइन नोंदणीचा पर्यायही उपलब्ध असून त्यासाठीची लिंक आचार्य अॅकॅडमीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.