शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी कुटुंबातील ऋतुजा भोरडे हिची नुकतीच वनविभागात वनरक्षक पदी नियुक्ती झाल्याने शक्ती महिला प्रशिक्षण केंद्र व ग्रामस्थांच्या वतीने ऋतुजा भोरडेची मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला आहे.
ऋतुजाने शेतातील कामे करत वेळप्रसंगी ट्रॅक्टरने शेतीची मशागत करुन जिद्दीने अभ्यास मिळवलेल्या यशातून करत वनविभागात वनरक्षक पदी ऋतुजाची वर्णी लागली असताना नुकतेच शक्ती महिला प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका शशिकला नलावडे व ग्रामस्थांच्या वतीने ऋतुजाची गावातून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले,
याप्रसंगी सरपंच बापू काळे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ, टाकळी भीमाचे पोलीस पाटील प्रकाश करपे, उद्योजक राहुल करपे, ऋषिकेश भोरडे, संतोष दौंडकर, कवी भरत दौंडकर, आकाश भोरडे यांसह आदी उपस्थित होते,
दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मिरवणूक मध्ये अनेक महिलांसह युवतींनी सहभाग घेतल्याने मिरवणूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले तर याबाबत बोलताना ऋतुजा भोरडेने मिळवलेले यश युवा पिढीला प्रेरणा देणारे असल्याचे मत शक्ती महिला प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका शशिकला नलावडे यांनी सांगितले.