पिरंगुट – भुगाव (ता. मुळशी) येथील गड किल्ले स्पर्धेत प्रथमेश सांगळे यांने वैयक्तिक किल्ला बनविणे स्पर्धेत प्रथम, तर विघ्नहर्ता मित्र मंडळाने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ७२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेते व सहभागी स्पर्धकांना शिवस्मारक देऊन गौरविण्यात आले.
भुगावचे माजी उपसरपंच व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख कालिदास शेडगे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभप्रसंगी समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होती. स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते. या स्पर्धेत मुलांनी किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती तयार केल्या होत्या. स्पर्धेचे आयोजन कालिदास शेडगे यांनी केले, तर सिद्धिविनायक मित्र मंडळ, कृष्णराज मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, भुगाव यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यावेळी सविता दगडे, शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, स्वाती ढमाले, भानुदास पानसरे, संतोष मोहोळ, प्रकाश भेगडे, बाळासाहेब सणस, वैशाली सणस, अर्चना सुर्वे, वनिता तांगडे, दिनेश सुर्वे, विशाल भिलारे, राहुल शेडगे, राम गायकवाड, दगडुकाका करंजावणे, वैभव पवळे, दत्ता झोरे, अमोल मोकाशी, गणेश दगडे, संकेत कांबळे, सचिन हगवणे, शिवाजी तांगडे, अजित इंगवले, जितेंद्र इंगवले, रमेश सणस, रोहिदास चोंधे, हनुमंत सुर्वे, माऊली आंग्रे, गोविंद आंग्रे, नामदेव माझिरे, तसेच भुगावमधील भजनी मंडळ उपस्थित होते.
यशस्वी स्पर्धक – वैयक्तिक किल्ला – प्रथमेश सांगळे (प्रथम), विराज खानेकर (द्वितीय), समर्थ इंगवले, कादंबरी आंग्रे (तृतीय).
सांघिक किल्ला – विघ्नहर्ता मित्र मंडळ (प्रथम), बालप्रतिष्ठान मित्र मंडळ (द्वितीय), स्वराज्य ग्रुप, हायलँड सोसायटी, आरोही रेसिडेन्सी, अखिल भेंडी आळी मित्र मंडळ (तृतीय).