सोरतापवाडी – पोलीस पाटलांचे काम चांगले असून लवकरच मानधन व इतर मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुच्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस पाटलांच्या शिश्टमंडळाला दिले.
उरुळीकांचन येथील नवीन पोलीस स्टेशनच्या उद् घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री पवार उरुळीकांचन येथे आले असता त्यांना महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादापाटील काळभोर, पुणे जिल्हा अध्यक्ष राळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यात मानधन वाढ व इतर मागण्यांसाठी उल्लेख असून निवेदन वाचून अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पोलीस पाटीलांच्या मागण्याचा जरूर विचार केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी राज्य पोलीस पाटील संघाचे खजिनदार नीलकंठ थोरात पाटील, पुणे जिल्ह्य पोलीस पाटील सघांचे कार्याध्यक्ष विजय कुंजीर पाटील, हवेली तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष विजय टिळेकर पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय चौधरी पाटील, मोहनराव कुंजीर पाटील,
चंद्रकात टिळेकर पाटील, समीर जाधव पाटील, वर्षा कड पाटील, रेश्मा कांबळे पाटील, तनूजा थोरात पाटील, वृषाली सावंत पाटील उपस्थित होते. तसेच पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटलांना घटकांत समावेश करून द्यावा. प्रत्येक गावांत शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घेत असुन पोलीस पाटलांचे काम अतिशय चांगले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.