कोथरूड – मातंग समाजाला नवी दिशा देण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र कार्य करत समाज एकजुट ठेवण्यात विजय डाकले यांचे योगदान मोठे आहे, असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजित पवार यांनी मातंग समाजाचे राज्यभर सुरू असलेल्या आंदोलन, त्यांच्या मागण्या आणि पुणे शहरातील झोपड़पट्टीतील नागरिकांच्या अडचणी, एसआरए यातील अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची पार्थ पवार यांनी भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक विकास समितीचे माजी अध्यक्ष विजय तुकाराम डाकले यांच्या निवासस्थानी पार्थ पवार यांनी भेट दिली. यावेळी शहर अध्यक्ष दिपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदिप देशमुख, माजी सभागृहनेते शंकर केमसे, युवक शहर अध्यक्ष समिर चांदेरे, कार्याध्यक्ष बालवडकर, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी दत्तात्रय धनकुडे, आप्पासाहेब रेणुसे, महेशराव हांडे, राकेशराव कामठे, योगेश वराडे, शशिकांत जगताप यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी सभागृहनेते शंकर केमसे, माजी नगरसेविका जयश्री मारणे, राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी सुर्यकांत भुंडे यांच्या निवासस्थांनी भेट घेऊन तेथील समस्यांबाबत चर्चा केली.