पिरंगुट (वार्ताहर) – देशामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मुळशी तालुक्यातील शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाने पाठिंबा दिला आहे.
नायब तहसीलदार भगवान पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुळशी तालुका शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष मोहन गोळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष भाऊ केदारी, चंद्रकांत लामखडे, सोमनाथ मातेरे, किसान युवा क्रांती संघटना अध्यक्ष सागर मातेरे, राजू पवळे, ज्ञानेश्वर कदम, दीपक मारणे, आण्णा पवळे, अजय पवळे, सोमनाथ गोळे, राजेश गोळे तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.