शिक्रापूर पोलिसांकडून चार तास शोध
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेली एक वृद्ध महिला हरवल्याची घटना घडल्यानंतर वृद्ध महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत महिलेला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे.
शिक्रापूर येथे एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास जाण्यासाठी लाखो अनुयायी आलेले होते. चाकण चौक परिसरात एक वृद्ध महिला चुकल्याने महिला बेदरलेली असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार रविकिरण जाधव यांना मिळाली. त्यांनतर पोलीस शिपाई विकास मोरे, महिला पोलीस नाईक निता चव्हाण यांनी चाकण चौक परिसरातून महिलेला ताब्यात घेत महिलेची विचारपूस केली.
मात्र, महिलेला नाव व पत्ता व्यवस्थित सांगता येत नसल्याने पोलिसांनी महिलेला पोलीस स्टेशन येथे विश्रांतीसाठी थांबवत, वृद्ध महिलेजवळील पिशवीतील कागदांच्या आधारने रेबूबाई दशरथ मगरे (वय ८०, रा. मुंबई) या महिलेची माहिती मिळवून पोलिसांनी परिसरातील सर्व पार्किंगच्या ठिकाणी जात माईकमधून महिलेबाबतची माहिती दिली.
कागदांच्या आधारे महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क करत अखेर पोलिसांच्या तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वृद्ध महिलेचे नातेवाईक पोलिसांना सापडले. दरम्यान, वृद्धेचे नातेवाईक आपल्या महिलेला पाहून गहिवरून गेले. नातेवाइकांनी पोलिसांचे आभार मानले.