एकलहरे येथे ग्रामस्थांची मागणी
मंचर – पुणे- नाशिक नवीन रस्त्यावरील एकलहरे (ता. आंबेगाव) येथे स्पीड ब्रेकर दोन लाइनचे बसविले आहेत. त्याऐवजी चार लाइनचे मोठे स्पीड ब्रेकर टाकणे गरजेचे आहे; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा माजी सरपंच संतोष डोके, माजी उपसरपंच नवनाथ शिंदे यांनी दिला.
शिंदेवस्तीकडे जाणारा नवीन पुन्हा रस्ता, कळंब पुलावर होणारे वारंवार अपघात लक्षात घेता (दि.18) पासून पुण्याच्या दिशेने एका बाजूने रस्ता जाणारा सुरू केला आहे. शिंदेवाडी येथे जाणाऱ्या रस्त्याकडे दोन लहान स्पीडब्रेकर टाकल्यामुळे नारायणगावजवळील खोडदसारखा अपघाताचा केंद्रबिंदू होण्याची शक्यता माजी सरपंच संतोष डोके यांनी वर्तवली आहे.
त्यासाठी याठिकाणी स्पीड ब्रेकरसह चार लाइन मोठे स्पीड ब्रेकर टाकणे गरजेचे आहे. अशी मागणी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, जनप्रिया संस्थेचे संचालक बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर कुरकुटे, भगवान शिंदे, नारायण आंग्रे, शिवाजी कुरकुटे,राजेंद्र शिंदे, दीपक शिंदे आदी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
रस्त्याने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, शेतीमालांची ने -आण होणार आहे. त्याकरिता अपघात टाळण्यासाठी शिंदेवाडी वस्तीकडे जाणाऱ्या फाट्यालगत दर्जेदार मोठे स्पीड बेकर गरजेचे आहे. माजी उपसरपंच नवनाथ शिंदे म्हणाले की, नवीन पुणे नाशिक रस्त्याचे सेवा रोडचे काम प्रलंबित असून शिंदेवाडी सर्कलपर्यंत रस्ता अपूर्ण असून हा महामार्ग रस्ता सुरू केला आहे. रस्त्यासंदर्भात विविध मागण्या मान्य न झाल्यास शिंदेवाडी ग्रामस्थांकडून जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.