युवा पैलवान वर्ष गायकवाड, विनोद गायकवाड यांचा सन्मान
बारामती : आई प्रतिष्ठान व सत्यव्रत अर्जुनराव काळे मित्र परिवार यांच्या वतीने शर्मिला पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 1) बारामतीमध्ये मिशन बोर्डिंग येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व केक कापण्याच्या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच यावेळी जिल्हास्तरीय जुदो कुस्ती स्पर्धेमध्ये बारामती शहरातील युवापैलवान वर्ष गायकवाड व विनोद गायकवाड या दोन बंधूंनी द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, मुस्लीम बॅंकेचे संचालक अल्ताफ सय्यद, मिशन बोर्डिंगचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सुभाष जांभुळकर, सिद्धनाथ भोकरे, निलेश इंगुले, इम्रान पठाण, तानाजी पाथरकर, अनिल कदम, साधू बल्लाळ, सुधाकर काटे, भाऊसाहेब पडळकर, सुधाकर माने, राजेंद्र सोनवणे,
विजय शितोळे, भालचंद्र ढमे, शेखर बनकर, सुरज देवकाते, रमेश देशपांडे यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल साळवे पाटील यांनी तर सत्यव्रत काळे यांनी आभार मानले.