पुणे -गावठाणांची मोजणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यामुळे वेळेची बचत होते. तसेच ड्रोनद्वारे मोजणीची अचुकता सुद्धा अधिक आहे. भूमि अभिलेख विभागाने राबविलेल्या या उपक्रमाची दखल केंद्र सरकारने घेतली असून देशभरातील गावांची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय घेतला. या योजनेला स्वामित्त्व’ हे नाव देण्यात आले आहे.
त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम येत्या रविवारी (दि.11) होणार आहे. देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांमध्ये या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. देशभरातील सुमारे 763 गावांतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे.
ड्रोनच्या सहाय्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमि अभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता. या उपक्रम देशभरात राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला.
नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार असून यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंढणपूर येथील शेतकरी विश्वनाथ मुजुमले यांना पंतप्रधान यांच्या हस्ते ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड देण्याचा मान मिळाला आहे.