आंतरराष्ट्रीय पशुप्रदर्शनामध्ये वाघ यांच्या गायीचा द्वितीय क्रमांक
भोर, वेल्हा, मुळशी, हवेली तालुक्यात चर्चा
खडकवासला – गोवंश संवर्धनासाठी चळवळ उभी राहावी. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे असे दोन दिवस भारतातील सर्वात मोठे देशी गोवंश पशु प्रदर्शनमध्ये कपिला ६ दात गटामध्ये कपिलेश्वरी या हनुमंत मारुती वाघ व विशाल भिकमदास ठाकर (रा. खानापूर, ता. हवेली) याच्या गाईला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
प्रदर्शनामध्ये खिल्लार, देवणी, लाल कंधारी, थारपारकर, म्हैस, रेडा, कांकरेंज, गिर, डांगी, साहिवाल, पुंगनूर, मालनाड गिड्डा, कपिला गाय,बैल, मारवाडी व भीमथडी अश्व मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खानापूर भागात प्रथमच पुरस्कार मिळाला आहे. सोनापूरचे भाऊ पवळे, खडकवासलाचे हरिचंद्र मते, गोरे बुद्रुकचे भरत खिरीड, डोणजेचे सोमनाथ पारगे, आतकरवाडीचे रोहिदास जेधे, गोरे खुर्दचे संजय माताळे, वरदाडेचे बाळू शेडे, खानापूरचे मनीष जावळकर, खामगावचे मावळ संजय दुधाने, मोगरवाडी लक्ष्मण दारवटकर, चांदेवाडी शशिकांत बदिर्गे, थोपटेवाडी उमेश थोपटे, खरमरी उमेश नवघणे, मालखेड सुनील जोरी, मालखेड उत्तम खाटपे, आंबी कैलास कापसे, कल्याण शरद चोरघे, कोंढणपूर दिलीप मुजुमले, राहटवडे सुभाष दरडगे, मोरदरी बाळू खाटपे, गोगलवाडी संभाजी गोगावले, कोंडगाव केतन दारवटकर,
थोपटेवाडी बबलू थोपटे, रांजणे नवनाथ दारवटकर, खामगाव क्षेत्र शिवाजी तोडकर, रुळे राजन जागडे, आंबी अनंता ढेबे, रुळे शिवाजी मरगळे, सांगरूण बापू लोंढे, कुरण बुद्रुक शिवाजी कडू, कुरण खुर्द दत्तात्रय ठाकर, कात्रज रणजीत बाबर, शिवापूर नितीन कोंडे, पाबे संतोष रेणुसे, वसेवाडी राजू वसवे, लासलगाव प्रभाकर आधवडे, मालवली हेमंत जाधव, कोंडवली सुनील काटकर, मालखेड रामभाऊ चरवड , विंजर रमेश भोसले, गुंजवणी संतोष भिलारे, फणसी तानाजी फणसे, वाजेघर विकास नलावडे उपस्थित होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी खानापूर डि. के. बेदरे, श्रीपाद करंजगावकर, डि. आर दिवार, प्रवीण सोनार, नाना मते यांनी मार्गदर्शन केले.
मी गेले 40 वर्षे दूध व्यवसाय व शेती व्यवसाय करत असून माझ्याकडे गोवंसीय कपिला गाय असून प्रदर्शनामध्ये गाईचा द्वितीय क्रमांक आला असून मला पशुवैदकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पशुचे योग्य ते उपचार व योग्य मार्गदर्शन मिळते.
– हनुमंत मारुती वाघ, गाई मालक.