श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीत मेरी जुबानी मेरी कहाणी
तळेगाव ढमढेरे – श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे विकसित भारत अभियान अंतर्गत मेरी जुबानी मेरी कहाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून लाभ मिळालेल्या विविध राज्यातील लाभार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. शिरूर पंचायत समिती व विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने भारत संकल्प यात्रा मोहीमच्या अंतर्गत चित्ररथाद्वारे विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली.
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी गावाची निवड करण्यात आली होती. हा डिजिटल विकास रथाच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आला. चित्ररथाचे पूजन सरपंच शंकर धुळे, गटविकास अधिकारी महेश डोके, तहसीलदार बाळासाहेब मस्के, विस्तार अधिकारी आर. आर. राठोड, पी. डी. आव्हाड यांच्या हस्ते झाले.
यावेळी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते विठ्ठलवाडी गावाला हगणदारीमुक्त गाव प्रमाणपत्र देण्यात आले. आयुष्यमान गोल्डन कार्डचे मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे, किसान मोर्चा भाजपा प्रदेश सचिव जयेश शिंदे, सरपंच शंकर धुळे, आरोग्य निरीक्षक तुषार कुंभार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता बेंगाळ,
पर्यवेक्षिका मीना वायाळ, ग्रामसेवक डी. एन. कुंभार, युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ, पंचायतराज आघाडीचे अध्यक्ष अजित चौधरी, रघुनंदन गवारे, माजी उपसरपंच महेंद्र गवारे, दिलीप गवारे, अनघा पाठक, महिला मोर्चाच्या भाग्यश्री गायकवाड, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, ए. जे. गायकवाड, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.