मनसे आक्रमक: नगरपरिषदेत अधिकाऱ्यांशी चर्चा, निवेदन
सविंदणे – शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये शिरूर बसस्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या फ्लेक्स उभारलेले आहेत. शिरूर नगरपरिषदेच्या सभागृहाने सुद्धा फ्लेक्स बंदिचा ठराव केलेला आहे.
कंपनीने कोणाच्या आशिर्वादाने फ्लेक्स लावले. याची चौकशी करावी व तात्काळ कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा; अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष महिबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे, मनसेचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र गुळादे यांनी दिला.
नगरपालिका कर्मचारी बर्गे यांच्यावर कारवाई कधी होणार, असा जाब पदाधिकाऱ्यांनी विचारला. शहरात महिला दहीहंडी कार्यक्रमाचे प्रथमच काही महिलांनी आयोजन केले होते. त्यांनी रीतसर सर्व परवानग्या मागितल्या होत्या. पण बर्गे यांनी अवास्तव पैसे मागत त्यांना सेवा नगरपालिकेच्या माध्यमातून दिली नाही. अशी गाऱ्हाणी महिलांनी मांडली आहे.
(दि.15) शिरूर बसस्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बोर्ड व फ्लेक्स लावून मोठी कमान उभारल्याची बाब पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.