संभाजी होळकर यांचा विशेष सन्मान
सुपे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून मंजूर असणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संत रोहिदास मंदिर सुशोभीकरण १० लाख, संत रोहिदासनगर रस्ता २० लाख, ग्रामपंचायत ते दर्गाह रस्ता २० लाख, शेंडगेवस्ती येथील सभामंडप १५ लाख आदी विकासकामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. संत रोहिदास नगरमध्ये विविध विकासकामांसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीच्या वतीने होळकर यांचा सत्कार करण्यात आला.
सुपे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच अश्विनी सकट, ग्रामपंचायत सदस्य सुधीर बारवकर, वैष्णवी बारवकर, विशाल चांदगुडे, सोमनाथ कदम, शफीक बागवान, निलोफर तांबोळी, नयना जगताप, अश्विनी जाधव, शंकर शेंडगे, मयुरी लोणकर, विलास वाघचौरे यांनी होळकर यांचा सन्मान केला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शौकत कोतवाल, बारामती पंचायत समितीचे माजी सभापती निता बारवकर, बारामती दूध संघाचे संचालक सुशांत जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. के. हिरवे,
सुपे सोसायटीचे चेअरमन मल्हारी खैरे, अशोक लोणकर, विलास धेंडे, संतोष लोणकर, मनोज खैरे, रणजित खैरे, महेश चांदगुडे, राजू तांबोळी, रफीक आत्तर, राजेंद्र कदम, प्रताप सातपुते, सुयेश जगताप, उमेश चोरमले उपस्थित होते.
—