गडावर पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण
जेजुरी – आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांच्या 192 वी पुण्यतिथी निमित्त जेजुरी गडाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थितीच्या वतीने पुष्पदृष्टी करीत अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक, युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवी खोमणे यांनी केले. तर देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे यांनी सांगितले की, जेजुरी गडाच्या पायरी मार्गाचे काम शासनाच्या विकास आराखडाच्या माध्यमातून पूर्णत्वाला गेल्यानंतर आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक पुतळा परिसर सुशोभीकरण आणि उर्वरित कामे केली जातील, असे नमूद केले.
यावेळी पुणे जिल्हा भाजप सदस्य सचिन पेशवे, विश्वस्त मंगेश घोणे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला देवसंस्थान विश्वस्त अॅड. पांडुरंग थोरवे, विश्वस्त अॅड. विश्वास पानसे, विश्वस्त अनिल सौंदडे, भाजपा तालुकाध्यक्ष निलेश जगताप, विश्व हिंदू परिषद धर्मा जागरण पश्चिम महाराष्ट्र सदस्य राजेंद्र चौधरी,
भाजपा कोल्हापूर जिल्हा प्रभारी अलका शिंदे, जेजुरी शहर सरचिटणीस विक्रम माळवदकर, माधुरी मोरे, सचिन मोरे, सचिन शिंदे, सुंदर खोमणे, शिवाजी चव्हाण, सुरेश खोमणे आदींसह पुणे, सांगली, सातारा कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मनोज आडके यांनी केले तर आभार माऊली खोमणे यांनी मानले.