भोर : पुणे जिल्हा परिषद , पंचायत समिती भोर , राजगड ज्ञानपीठ भोर , यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित भोर तालुका विज्ञान प्रदर्शन भोर 2023 – 24 सरनोबत शिदोजी थोपटे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज खानापूर भोर येथे 27 डिसेंबर आणि 28 डिसेंबर ला संपन्न झाले .
विज्ञान प्रदर्शनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मिडियम स्कूल भोर मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तर गट १ मधील पहिलीे ते पाचवी मधून पार्श्वना मादगुडे इयत्ता चौथी मधील विद्यार्थीनीला बायोलॉजिकल अमृत सस्टेनेबल फार्मिंग फॉर सेल्फ रिलायन्ट इंडिया प्रथम क्रमांक मिळाला. तसेच कुमारी संचिता गणेश बोरसे गट सहावी ते आठवी( पोर्टेबल इरिगेशन सिस्टीम फॉर स्मॉल स्केल फार्मिंग) तसेच कुमारी रेवती सचिन कदम गट नववी ते बारावी ( सलाईन मॉनिटरिंग सिस्टीम इन हॉस्पिटल यांनी सहभाग नोंदवला.
गट २ मधील इयत्ता सहावी ते आठवी मधून वकृत्व स्पर्धेमध्ये इयता सहावी मधील संचिता बोरसे या विद्यार्थीनीला तिसरा क्रमांक मिळाला. गट नववी ते बारावी मधून श्रेया कोळसकर हिने सहभाग घेतला तर प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये गट तीन मधील इयत्ता नववी ते बारावी मधून इयत्ता दहावीतील यश शिंदे आणि सोहम रांगोळे या विद्यार्थ्यांना तिसरा क्रमांक मिळाला.
सहावी ते आठवी गटातून इयत्ता सहावीतील कुमारी ऋषिता कोंढाळकर तसेच नववी ते बारावी गटातून इयत्ता नववीतील सृष्टी दानवले यांनी सहभाग घेतला.
या सर्व स्पर्धकांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे व विज्ञान शिक्षिका कल्पना राजे, अंजली समगीर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांनी अभिनंदन केले .