राजुरी ते खांडसरी फाटा रस्त्याचे भूमिपूजन
राजुरी – शिवभूमीच्या विकासासाठी खरंतर ध्यास घेतला होता आमदारकी ही खुर्चीसाठी नव्हती तर आम जनतेसाठी सेवेसाठी होती. पाच वर्षे जनतेने आमदारकी दिली, त्या पाच वर्षांत शिवभूमीच्या विकासासाठी अडीच हजार कोटी पेक्षा जास्त निधी आणला. जुन्नरच्या विकासासाठी नेहमी प्रयत्न करीत राहील. सरकारची तिजोरी ही जनतेची आहे त्यामुळे जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे जनतेची सेवा करीत राहील, असे मत आमदार शरद सोनवणे यांनी व्यक्त केले.
राजुरी (ता. जुन्नर) येथे राजुरी ते खांडसरी फाटारस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी सोनवणे बोलत होते. यावेळी माजी सभापती दीपक औटी, सरपंच प्रिया हडवळे, उपसरपंच माऊली शेळके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पप्पूशेठ हाडवळे, माजी सरपंच एम. डी. घंगाळे, एकनाथ शिंदे, बाळासाहेब हाडवळे, गणेश दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष कारभारी औटी, माऊली हाडवळे, बाळासाहेब हाडवळे, राजेंद्र हाडवळे, मोहन हाडवळे, अनिल रायकर, गौरव घंगाळे, शाकीर चौगुले, मोहन नायकोडी, संजय औटी, बाबाजी सरोदे आदी उपस्थित होते.
माजी आमदार सोनवणे म्हणाले की, राजकारण फार वेगळ आहे मला राजकारण कळायला दहा वर्षे लागली त्यावेळी मला शिवसेना आणि राष्ट्रवादी दिसायला वेगवेगळे आहेत असे वाटायचे पण नंतर मला कळाले हे सगळे एकच आहेत त्यामुळे तुम्ही आपला माणूस म्हणून माझ्याकडे पहा मी आपली सेवा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सरपंच एकनाथ शिंदे म्हणाले की, माजी आमदार शरद सोनवणे यांच्याप्रयत्नांनी राजुरी ते खांडसरी फाटा रस्त्यासाठी एक कोटी रुपये निधी आणला आहे.या रस्त्याचे काम चांगले होईल पण पुढे तीन किलोमीटर रस्ता बाकी राहत आहे त्यामुळे त्या रस्त्यासाठी 50 लाख रुपये निधीची गरज असल्याचे माजी सरपंच एकनाथ शिंदे यांनी सांगितले.