पुणे – मध्य रेल्वेच्या वतीने पुणे-लोणावळा मार्गावर अभियांत्रिकी आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार (दि. ४ ) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा मार्गावरील १४ लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
यात प्रामुख्याने पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७, ११.१७, दुपारी १२,०५, दुपारी ३.००, ३.४७, सायंकाळी ४.२५, ५.२० मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल ट्रेन रद्द करण्यात आली आहे. तर लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी १०.०५, ११.३०, दुपारी २.५०, सायंकाळी ४.४०, ५.३० मिनिट, सायंकाळी ६.०८ आणि ७.०० वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. तर, एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई (ट्रेन क्रमांक १२१६४) सुपरफास्ट एक्स्प्रेस या दरम्यान दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी पुढे मार्गस्थ होणार आहे.