आमदार अतुल बेनके यांची माहिती
नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील 26 साठवण बंधार्यांच्या कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 10 कोटी 24 लाख रुपयास मंजूरी दिली असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
तालुक्यातील भूजल पातळीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने साठवण बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न केले जात असून यापुर्वीही तालुक्यात विविध ठिकाणी जलसंधारण बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. मंजूर झालेली कामे निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
खामुंडी नं. 1 गेटेड साठवण बंधारा 55 लाख 93 हजार, खामुंडी नं. 2 साठवण बंधारा 35 लाख 77 हजार, खामुंडी नं. 3 साठवण बंधारा 37 लाख 6 हजार, खामुंडी नं. 4 साठवण बंधारा 28 लाख 56 हजार, गुळुंचवाडी नं. 1 साठवण बंधारा 33 लाख 29 हजार,
गुळुंचवाडी नं. 2 साठवण बंधारा 34 लाख 80 हजार, आलमे नं. 1 साठवण बंधारा 28 लाख 56 हजार, आलमे न. 2 साठवण बंधारा 27 लाख 23 हजार, आलमे नं 3 साठवण बंधारा 28 लाख 70 हजार,
पिंपरी पेंढार नं. 1 साठवण बंधारा 24 लाख 18 हजार, धामणखेल नं. 1 साठवण बंधारा 30 लाख 35 हजार, धामणखेल नं. 2 साठवण बंधारा 23 लाख 81 हजार, धामणखेल नं. 3 साठवण बंधारा 28 लाख 89 हजार, बोरी बु. नं. 1 साठवण बंधारा 41 लाख 53 हजार, बोरी बु. नं. 2 साठवण बंधारा 33 लाख 88 लाख, बोरी बु. नं. 3 साठवण बंधारा 66 लाख 46 हजार,
राजुरी नं. 1 साठवण बंधारा 47 लाख 60 हजार, राजुरी नं. 2 साठवण बंधारा 49 लाख 28 लाख, काळवाडी नं. 1 साठवण बंधारा 45 लाख 63 हजार, चिंचोली नं. 1 साठवण बंधारा 47 लाख 93 हजार, पिंपळवंडी नं. 2 साठवण बंधारा 56 लाख 35 हजार, सोनावळे नं. 1 साठवण बंधारा 60 लाख 9 हजार,
पिपळवंडी नं. 3 साठवण बंधारा 44 लाख 47 हजार, पिंपळवंडी नं. 4 साठवण बंधारा 30 लाख 3 हजार, मंगरूळ नं. 1 साठवण बंधारा 26 लाख 47 हजार, खोडद नं. 1 साठवण बंधारा 39 लाख 22 हजार रुपये आदी कामांचा समावेश आहे.