शिक्रापूर – महाराष्ट्रभरात सकल मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने होत असलेल्या आंदोलनाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत असताना हिवरे कुंभार ग्रामस्थांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सरपंच दिपाली खैरे यांनी पंधरा दिवसांचे बाळ घेऊन ऐन उन्हात हजेरी लावली. ग्रामस्थांसह सोशल मिडीयावर सरपंचांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
हिवरे कुंभार येथे 2 नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवत आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी सरपंच दिपाली खैरे, उपसरपंच दिपक खैरे, माजी सरपंच व चेअरमन अमोल जगताप, सुनील जगताप, ग्रामपंचायत सदस्य नैना मांदळे, हौसाबाई जगताप, सोमनाथ आढाळगे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राजश्री तांबे,
तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल साळुंके, रेवणनाथ जाधव, राजेंद्र साळुंके, परशुराम साळुंके, वसंत शिर्के, जालिंदर मांदळे, माऊली गोडसे, अनिल तांबे, आनंदा तांबे, संदेश साळुंके, पंढरीनाथ तांबे, संतोष मांदळे, अनमोल मांदळे, शामल जगताप, उषा तांबे, सविता शितोळे, माऊली गोडसे,
शुभांगी शितोळे यांसह आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आंदोलनात पूर्ण गाव एकवटलेले असताना सरपंच दिपाली खैरे यांनी आपल्या पंधरा दिवसाच्या बाळाला घेऊन आंदोलन स्थळी हजेरी लावत आंदोलनात सहभागी झाल्या.