चिंबळी : फडकेवस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरी काढण्यात आली. स्नेहा फडके, मंगल येळवंडे, सुनीता शिरोळे, अंगणवाडीसेविका लता फडके, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबाजी येळवंडे, यशवंत फडके यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहन ग्रामपंचायत सदस्या इंदिरा फडके यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले, असे मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, कसरती सादर केल्या. याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन यशवंत फडके, शाळा समितीचे अध्यक्ष राजेश येळवंडे, सदस्य गजानन फडके, विशाल फडके, दिलीप फडके, संजय फडके, गणेश फडके, नवनाथ फडके, नाना फडके, सचिन फडके, प्रदिप शिरोळे, आकाश फडके, नम्रता फडके, शिक्षिका सीताबाई गेंगजे उपस्थित होते.
निघोजे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सुनिता येळवंडे व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपसरपंच व सर्व सदस्य तसेच आजी माजी पदाधिकाऱ्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. चिंबळी ग्रामपंचायतीचे ध्वजावंदन सरपंच ज्योती जैद, उपसरपंच राहुल चव्हाण व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
मरकळ येथे सरपंच अमोल लोखंडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे व उपसरपंच, सदस्यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वजाला समाली देण्यात आली. मोई निघोजे, केळगाव, कुरूळी परिसरात विविध मान्यवरांसह आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली.