येडगावातील डॉ. कशिद महिन्याला घेतात 60 हजारांचा नफा
पॉईंटर : सहा गिर गायींच्या माध्यमातून 2014 पासून शाश्वत उत्पन्न
नारायणगाव – येडगाव (ता. जुन्नर) येथील पशुवैद्यकीय पदविकाधारक डॉ. आदेश सोनू कशिद यांनी देशी गायीच्या शेण गोमुत्रापासून स्वतःचे विविध वात्सल्य युनिक उत्पादने तयार केली आहे. अत्यल्प शेती असलेल्या डॉ. काशिद यांनी 2014 पासून शाश्वत उत्पन्न देणारी देशी गोपालनाचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये सहा देशी गिर गायी व सहा कालवडींचा समावेश आहे. डॉ. काशिद यांनी नोकरी सोडून देशी गायींचे संगोपन केले व त्यापासून फक्त दूध देणारी नाही तर शेणमूत्रापासूनही आर्थिक लाभ मिळतो हे सिद्ध करून दाखवले. महिन्याला साधारण 60 हजार रुपये नफा मिळत असून शेणमूत्रापासून शेतीला फवारणीसाठी उपयुक्त औषधासह शेणाच्या गवर्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
देशी गोपालन करीत असताना भारतीय देशी गाय व तिची वैज्ञानिक परिभाषा समजून घेण्यासाठी डॉ. आदेश काशिद यांनी प्रशिक्षण घेतले. देशी गायीच्या शेण, गोमुत्रामध्ये खरोखरच ‘लक्ष्मी’ दडलेली असल्याचे सिद्ध करून आपण कल्पकता वापरून तिचा शोध घ्यायला हवा असे म्हटले. वात्सल्य युनिक उत्पादन बघण्यासाठी पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष, जुन्नर तालुका गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यासह गुजरात, तेलंगणा, कर्नाटक राज्यातून शेतकर्यांचा अभ्यास गट, जर्मनी, स्पेन व इजराइल येथील पाहुण्यांनी भेट दिली आहे. नाविन्यपूर्ण व प्रयोगशील शाश्वत शेती मॉडेल तयार करण्यासाठी नारायणगावचे कृषी विज्ञान केंद्र मोलाची मदत करीत आहे.व्यवसाय उभा करत असताना कुटुंब, मित्रांसह पत्नी दीपा काशिद प्राथमिक शिक्षिका असून मोलाची साथ लाभली.
वात्सल्य युनिकचे विविध उत्पादने
गायीच्या गोमुत्रापासून गोमय स्क्रब (अंघोळीचा) साबण, फेस पॅक, दंतमंजन, पूजेसाठी धूप, नस्य, गोमूत्र अर्क, अग्निहोत्र गौरी. तसेच सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क, स्लरी.
गिर गायीच्या दूधापासून मिळणारे उत्पादन, विक्रीदररोज 10 लिटर : प्रतिलिटर 90 रुपयांप्रमाणे विक्रीतूप 3 हजार किलो,पनीर 500 रुपये किलो, ताक 20 रुपये लिटर
येडगाव येथील वात्सल्य युनिक उत्पादनाचे संचालक डॉ. आदेश काशिद यांनी नाविन्यपूर्ण देशी गोपालन करून अर्धा एकर क्षेत्रामध्ये शाश्वत शेतीचे मॉडेल उभे केले आहे. यातून त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा देखील लाभ घेतला आहे. शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले असून कृषी विज्ञान केंद्राचा ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार- कृषी उद्योजक 2019 मिळाला आहे.
– धनेश पडवळ, विषय तज्ज्ञ पशुसंवर्धन, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव