देऊळगावराजे – सिद्धटेक (ता. कर्जत) येथील संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पहाटेपासून अनेक भाविकांकडून श्रींच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आले. पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांतील भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पिंपरी)चिंचवड देवस्थान ट्रस्टमार्फत श्रींच्या मूर्तीला अभिषेक आणि हार घालून विविध प्रकारची फुले वाहून सजावट करण्यात आली होती. श्रींच्या मूर्तीला आभिषेक झाल्यानंतर दागिने घालून पोशाख चढविण्यात आला.
दुपारी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. चौथा शनिवार आणि नाताळाची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात गर्दी झाली होती तसेच येथील बाजारपेठ फुलून दिसत होती. पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविकांसाठी दर्शन बारी आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.