सासवड -सिंगापूर (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दशरथ देवराम लवांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच रामदास उरसळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी दशरथ लवांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रभावती कोरे यांनी घोषित केले. जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव व पानवडीचे माजी सरपंच हरिभाऊ लोळे यांच्या हस्ते नुतन सरपंचांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामसेविका मीरा होले, उपसरपंच स्वाती कोरडे, रामदास उरसळ, अक्षय उरसळ, शुभांगी पवार, जयश्री वारे, निर्मला लवांडे, आबासाहेब कोरडे, लक्ष्मण उरसळ, विशाल लवांडे, प्रवीण लवांडे, भाऊसाहेब लवांडे, विक्रांत पवार, संदीप लवांडे उपस्थित होते. सर्वांना विश्वासात घेऊन गावचा कारभार आपण करणार असल्याचे दशरथ लवांडे यांनी सांगितले.