पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शहारातील एकूण रुग्णसंख्या 53 हजारांच्या पुढे गेली आहे. रुग्णसंख्या सतत वाढत असतान अत्यवस्थ रुग्णांची संख्याही वाढली आहे. सद्यस्थिती महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 74 रुग्ण अत्यवस्थ आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
शहरातील उपचाराधीन असलेल्या रुग्णांपैकी 7662 रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर 790 रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आहेत. तसेच 164 रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर 74 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांमध्ये तरूणांची संख्या सर्वाधिक आहे. 22 ते 39 वर्ष वय असलेल्या 21 हजार 202 तरुणांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी 45 हजार रुणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे.